Fri. Sep 30th, 2022

बल्क ड्रग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग प्रकल्पासाठीच्या हालचालीना पुन्हा एकदा वेग आलाय. या प्रकल्पासाठी शेकडो एकर जमीन संपादित केली जाणार आहे. परंतु, ‘या प्रकल्पाला रोहा आणि मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असुन हा विरोध डावलून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून सुरू आहे. या भागातील शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी सरकारजमा करण्याचा घाट घातला जातोय’ असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडुन केला जात आहे. भाजप या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला असुन यासंदर्भात वस्तुस्थिती मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी ३ जुलै रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.