Mon. Jul 4th, 2022

शेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुगल ट्रान्सलेटरचा फटका बसला आहे.

इंग्रजीत नावांचा भलताच अर्थ निघाल्याने वाळवा तालुक्यातील बावची गावातील ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’च्या यादीमध्ये तब्बल 628 शेतकऱ्यांना लाभच मिळाला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना नावे दुरुस्ती करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागत आहे.

वाळवा तालुक्यातील बावची गावात पतंप्रधान सन्मान योजनेमधून काही शेतकऱ्यांना दोन हजाराचा पहिला हप्ता मिळाला.

पण दुसरा हप्ता का मिळाला नाही म्हणून चौकशी केली असता अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना लाभ तर मिळालाच नाही पण स्वतःची नावं दुरुस्ती करण्यासाठी काम धंदा सोडून दिवसभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांची नावाची यादी तात्काळ मागवली गेली. तेव्हा संगणकावर भरताना गुगल ट्रान्स्लेटरमुळे नावात आणि स्पेलिंगमध्ये चुका झाल्या.

मराठी किंवा इंग्रजी कच्चं असणाऱ्यांसाठी गुगलने भाषांतराची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत भाषांतर करता येतं.

मात्र, हे भाषांतर अगदीच प्राथमिक आणि क्वचित प्रसंगी अतिचुकीचं असू शकतं, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे.

पण सांगलीमधल्या काही शेतकऱ्यांना या गुगल ट्रान्सलेटर भाषांतराचा मोठा फटका बसला आहे.

‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’चा लाभ मिळण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांची नोंदणी संगणकात करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या मराठी नावांची संगणकात इंग्रजीत नोंदणी केली गेली आणि तिथेच मोठा घोळ झाला.

शेतकऱ्यांची नावंच या इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदलल्यामुळे ते शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

यामुळे सध्या गावात शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामा संबधी चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.