Fri. Apr 16th, 2021

खासगी सावकारांच्या जाचामुळे शेतकरी कुटुंबाचं उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून बीडमधील शेतकरी कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषणाला बसलं आहे. दत्ता मोरे आपल्या कुटुंबासह 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत.

 

मात्र, एकाही अधिकाऱ्यानं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. दत्ता मोरेंनी खासगी सावकाराकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं.

 

कर्जाची सर्व रक्कम व्याजासहित परत करूनही सावकार जमीन परत करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *