Tue. May 21st, 2019

राम मंदिर अयोध्येतच का हवं? – फारुख अब्दुल्ला

0Shares

‘प्रभू रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्ववंदनीय आहेत. त्यांचं मंदिर फक्त अयोध्येतच बांधले जावे हा हट्ट का?  असा सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीसाठी सरकारवर दबाव वाढत आहे. याच अनुषंगाने अब्दुल्ला यांनी राम मंदिरावर भाष्य केले. ‘राम हे तर संपूर्ण जगाचे आहेत. मग त्याचं मंदिर फक्त अयोध्येत का हवंय,’ असं ते म्हणाले.

तिथे उपस्थित असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘राम मंदिर अयोध्येत का बांधलं जाऊ नये? अयोध्या हे रामचंद्रांचं जन्मस्थळ आहे. हिंदूंना त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर व्हावं असं वाटत असेल तर त्यात चुकीचे काय?,’ असा प्रतिसवाल वर्मा यांनी केला. राम मंदिर अयोध्येत बनवायचं की नाही हा प्रश्नच नाही. तर, ते कसे बनवायचे हा मुद्दा आहे. मंदिर जोरजबरदस्तीने बनावयचं, सर्वसहमतीनं बनवायचं की न्यायालयाच्या आदेशाने बनवायचं हा प्रश्न आहे,’ असेही यावेळी वर्मा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *