Tue. Oct 19th, 2021

मुंबईत उपचारासाठी आलेल्या जगातील सर्वात लठ्ठ महिलेचे वजन 177 किलोवर आले पण…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इमान अहमदला अबुधाबीला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

500 किलो वजन असलेल्या इमानवर उपचार करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये तिला इजिप्तहून मुंबईत आणण्यात आलं होेते.

 

इथल्या सैफी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असून आता तिचं वजन 177 किलो इतकं झाले.

 

दरम्यान इमानची बहिण शायमाने इमानच्या वैद्यकीय अहवालावर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर शायमा आणि हॉस्पिटल प्रशासनात वाद पेटला होता.

 

सध्या सैफी हॉस्पिटल इमानला डिस्चार्ज देण्याचा विचार करत आहे. तर अबुधाबीच्या बुरजील रुग्णालयाने इमानवर उपचार करण्याची तयारी दाखवली असून त्यासाठी तिला अबुधाबीला

हलवण्यात येऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *