Sun. Apr 18th, 2021

नराधम बापाने केला आपल्याच मुलाच्या गर्लफ्रेंडवर वारंवार बलात्कार

वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार तामिळनाडूमधील वेदारण्याम भागात घडला आहे. वेदारण्यमजवळील सोम्बोदाई येथे नराधम बापाने आपल्या मुलाच्याच गर्लफ्रेंडवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं सेम्बोदईमध्ये गारमेंट्सचं दुकान होतं. त्याचा मुलगा एका स्पोर्ट्स शॉपमध्ये नोकरीला होता.

याच ठिकाणी त्याचं एका मुलीवर प्रेम जडलं.

दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता.

मात्र याबद्दल मुलाच्या वडिलांना कळल्यावर त्यांनी या नात्याला विरोध केला.

आपला मुलगा आपलं ऐकत नाही, हे पाहून आरोपी बापाने कुटील कारस्थान रचलं.

आरोपीने आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंडला लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावून घेतलं.

मुलाचे वडील आपल्या लग्नाला तयार होत असल्याचं पाहून आनंदी झालेली मुलगी आपल्या होऊ घातलेल्या सासऱ्यांना भेटायला सोम्बोदईला गेली.

यानंतर मुलाच्या वडिलांचा हेतू वेगळाच असल्याचं समजताच ती घाबरली. आपल्या बॉयफ्रेंडला फोन करायचा ती प्रयत्न करू लागली.

मात्र संतापलेल्या बापाने तिचा मोबाईल हिसकावून घेतला.

तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसूत्र घातलं. त्यानंतर तिला दोन दिवस आपल्या घरात डांबून ठेवलं आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

अखेर दोन दिवसांनी मुलाला या प्रकाराचा शोध लागला आणि त्याने मुलीची सुटका केली. त्यानंतर दोघांनीही नराधम बापाविरोधात वेदारण्याम पोलीसांत तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *