Sat. Feb 22nd, 2020

फर्जंदच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा फत्तेशिकस्त प्रेक्षकांच्या भेटीला

 चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन इतिहासप्रेमींना पहायला मिळणार आहे.  शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेवर आधारित हा सिनेमा आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या फर्जंद या चित्रपटाला चांगल यश मिळालं होतं.  या यशानंतर ते आणखी एक मराठी  चित्रपट प्रदर्शित करत आहेत. त्यांचा फत्तेशिकस्त हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन इतिहास प्रेमींना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भुमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसणार आहे.

असा असणार फत्तेशिकस्त ?

शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेवर हा चित्रपट आधारलेला आहे. हा सिनेमा पाहत असताना शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण पुर्ण महाराष्ट्राला होईल,असं फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या टीमचं मत आहे.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर असे अनेक कलाकारांनी काम केले आहे.

हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी फत्तेशिकस्त या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. अनुप सोनी यांनी गंगाजल, तथास्तू, फिजा, अपहरण या हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच क्राईम डायरी या कार्यक्रमामध्येही त्यांची चांगली भुमिका आहे.

दिग्पाल लांजेकरांनी फर्जंद या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद यांना किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजेची संघर्षमय गाथा  मांडण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी र्फजदची भूमिका साकारली होती.

याही चित्रपटात अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराज यांची भुमिका साकारली होती. तसंच या चित्रपटातील शिवरायांच्या भुमिकेत चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांच्या मनावर आपले स्थान कायम ठेवतो का हे बघाव लागेल.  आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *