Thu. Sep 19th, 2019

फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘कोळसे पाटील Go Back’ची घोषणाबाजी

0Shares

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दुपारी बारा वाजता गेले होते. त्यावेळी तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. ‘Simon Go back’ च्या धर्तीवर ‘कोळसे पाटील Go Back’ चे नारे देण्यात आले.

‘कोळसे पाटील मुर्दाबाद’ अशा प्रकारच्या घोषणा ABVPच्या विद्यार्थ्यांनी दिल्या. एवढंच नव्हे, तर ‘कोळसे पाटील Go back’, ‘राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार?’ अशा प्रकारच्या घोणणा आणि पाट्या दाखवत  विरोध दर्शवला. मात्र त्यांच्या बाजूने असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

काय आहे प्रकरण?

फर्ग्युसन कॉलेजच्या amphitheater  मध्ये कोळसे-पाटील यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं.

शनिवारी अचानक कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आली.

त्यामुळे कॉलेजमध्ये तणावाचं वातारण निर्माण झालं.

परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांच्या एका गटाने कार्यक्रम आयोजित केला.

मात्र B.G. कोळसे-पाटील college मध्ये प्रविष्ट झाल्यावर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश केला.

तेथे संवाद साधून मग ते तेथून बाहेर पडले.

यावेळी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

 

 

कोळसे पाटील यांनी केली टीका

‘फर्ग्युसन कॉलेजचे व्यवस्थापन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे’, अशी टीका करत कोळसे पाटील यांनी आरोप केला आहे. त्यावर डेक्कन एज्युकेशन नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे हे स्पष्टीकरण देत म्हणाले की, “कॉलेजच्या संचालकांनी नजरचुकीने कार्यक्रमाला परवानगी दिली होती. ही बाब लक्षात येताच शनिवारी कार्यक्रमाची परवानगी नाकारली.” तसंच ‘आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली ही परवानगी नाकारली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *