Sat. Sep 21st, 2019

‘फिरोजशाह कोटला मैदाना’ला देण्यात येणार अरुण जेटलींचं नाव

0Shares

दिल्लीचं फिरोजशाह कोटला मैदान (Firozshah Kotla Stadium) ला आता भारताचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं नाव देण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी जेटली यांचं निधन झालं. आता फिरोजशाह कोटला मैदानाचं नाव ‘अरुण जेटली मैदान’ असणार आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) हा मोठा निर्णय मंगळवारी घेतला. लवकरच या निर्णयाची अमलंबजावणी करण्यात येईल.

अरुण जेटली यांनी या क्रिकेट असोसिएशनला पाठींबा दिल्यामुळेच Team India ला विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर,आशिष नेहरा आणि ऋषभ पंत यांसारखे खेळाडू मिळाले. त्यामुळेच हे खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करू शकले. त्यासाठीच फिरोज शहा कोटला मैदानाला अरुण जेटली याचे नाव देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

या स्टेडियमला अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात दिवंगत अरुण जेटली यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसंच प्रेक्षकांची संख्या वाढावी, खेळाडूंना चांगली ड्रेसिंग रूम मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *