पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक पाहता राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक शाळांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे.
राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे. तसेच या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा २० फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र आता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळेला टाळे लागले. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद झाले आहे. दरम्यान आता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्मय घेण्यात आला आहे.