Thu. Jan 28th, 2021

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि BSF जवानांमध्ये चकमक; ४ जवान शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदिया येथे झालेल्या सभेत माओवाद्यांचे दिवस भरले असल्याचे म्हटलं असतानाच नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. छत्तीगडच्या बस्तर जिल्ह्याच्या कांकेर जिल्ह्यात हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये बीएसएफचे ४ जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पंखाजूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

बीएसएफचे जवान गस्ती घालत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.

छत्तीगडच्या बस्तर जिल्ह्याच्या कांकेर जिल्ह्यात हा हल्ला केल्याचे समोर आले आहे

यावेळी बीएसएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी  माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात पंखाजूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *