Mon. Jul 22nd, 2019

‘कडकनाथ’ कुणाचा? 2 राज्यांमध्ये वाद!

0Shares

गेल्या काही वर्षांपासून कडकनाथ कोंबडा हा non-veg खाणाऱ्यांच्या खास मागणीतला पदार्थ बनला आहे. काळ्या कुळकुळीत कडकनाथचं चिकन जास्त पोषक आणि प्रोटिन आणि आयर्नने भरलेलं असतं. त्यामुळे कडकनाथची किंमतही चांगलीच महाग असते. मात्र आता कडकनाथ नेमका कोणाचा यावर दोन राज्यांमध्ये वाद सुरू झालाय.

कडकनाथ कोंबडी अंडी देते पण ती उबवत नाही.

ही अंडी उबवण्यासाठी स्पेशल incubator वापरावं लागतं.

ही अंडीदेखील protein आणि Iron साठी उपयुक्त असतात.

कडकनाथ कोंबडी इतर कोंबड्यांपेक्षा तिप्पट वजनदार असते.

कडकनाथचं रक्तदेखील काळंच असतं.

कुक्कुटपालन करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कडकनाथ हे वरदान ठरत आहे.

कडकनाथ महागडं असूनही मागणी प्रचंड आहे, कारण कडकनाथ चवीला खूप स्वादिष्ट आणि प्रकृतीसाठीही फायदेशीर आहे.

मात्र आता कडकनाथच्या GI टॅगिंगवरून देशातल्या दोन राज्यांमध्ये जुंपली आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ या दोन्ही राज्यांनी कडकनाथसाठी ‘GI’ टॅग आपल्याला मिळावा यासाठी चेन्नईच्या भौगोलिक सांकेतिक registration ऑफिसमध्ये निविदा सादर केली आहे.

मध्य प्रदेशचा दावा-

कडकनाथ कोंबड्याची उत्पत्ती मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात झाली आहे, त्यामुळे कडकनाथ मध्य प्रदेशचा आहे, असं मध्य प्रदेशचं म्हणणं आहे.

छत्तीसगढ़चा दावा-

छत्तीसगढ़च्या दंतेवाडा जिल्ह्यात कडकनाथचं नैसर्गिकरीत्या प्रजनन केलं जातं आणि वाढवलं जातं, त्यामुळे कडकनाथचं registration हे छत्तीसगढला मिळावं असा दावा छत्तीसगढ़कडून करण्यात आलाय.

काळ्या कडकनाथाप्रमाणेच पांढऱ्या रसगुल्ल्यासाठीही राज्यांत वाद

अशाच प्रकारे पूर्वी रसगुल्ल्यावरून बंगाल आणि ओदिशा यांच्यात वाद सुरू होता. बंगाली मिठाईतील गोड पदार्थ रसगुल्ल्याचं जनक नेमकं कोणतं राज्य आहे, यावरून हा वाद निर्माण झाला होता. त्यावरच रसगुल्ल्यावर मालकी हक्क कुणाचा राहणार यावर हा वाद होता. ओदिशामध्ये रसगुल्ला 600 वर्षांपासून आहे, त्यामुळे ओदिशालाच त्याची मालकी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती, तर बंगाली मिठाईमध्ये फार पूर्वीपासून रसगुल्ला वापरात असल्यामुळे रसगुल्ल्यावर हक्क बंगालचाच असल्याचा दावा होत होता.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: