Jaimaharashtra news

महिला सरपंच- उपसरपंचात राडा, ग्रामपंचायतीचा बनला आखाडा!

अमरावती जिल्ह्यातील वालगाव येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत जोरदार राडा झाला. आमसभा सुरू असताना सरपंच आणि उपसरपंच यांच्यात वादविवाद सुरू झाला.

या वादविवादाने आक्रमक रूप धारण केलं आणि ग्रामपंचायतीचा अक्षरशः आखाडा बनून गेला.

यात सरपंच महिलेने उपसरपंचाला चोप दिला.

उपसरपंचानेसुद्धा महिला सरपंचाला चांगलीच मारहाण केली.

त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आपसात भिडले.

ग्रामपंच्यायतीच्या कार्यालयाचीही तोडफोड झाली.

वलगाव ग्रामपंचायतीमध्ये सेवानिवृत्त कर्मच्याऱ्याला सारपंचाने रोजंदारी तत्वावर कामावर ठेवले होते.

मात्र त्याला कामावर का ठेवले असा विरोधकांनी आरोप केला.

त्यानंतर हा वाद सुरू झाला.

या वादाने उग्ररूप धारण केलं आणि थेट महिला सरपंचांना उपसरपंचाने अश्लील शिवीगाळ केली.

मात्र यावेळी महिला सरपंचांनी उपसरपंचांच्या कानशिलात लगावली.

यानंतर दोघांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

यात विरोधक आणि सर्व सदस्यांमध्ये वाद झाल्यावर ग्रामपंचायतीमध्ये तोडफोड करण्यात आली.

या संदर्भात दोन्ही पक्षांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

वालगाव पोलीस तपास करीत आहे.

Exit mobile version