Sun. Apr 21st, 2019

जळगावच्या महायुती मेळाव्यात राडा; गिरीश महाजन यांना धक्काबुकी

250Shares

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा उद्यापासून सुरू होत असताना जळगावच्या अमळनेरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी एस पाटील यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र या वादाचे रूपांतर हाणामारी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. हा वाद सुरू असताना गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं ?

जळगावच्या अमळनेरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी एस पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.

सध्या जळगावमध्ये आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द केल्यामुळे हा वाद झाल्याचे समजते आहे.

या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

हा वाद थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला.

यावेळी गिरीश महाजन यांना धक्काबुकी झाल्याचेही समजते आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *