Wed. Jun 26th, 2019

TikTok व्हिडिओ बनवणाऱ्यांना हसल्याचा राग, म्हणून बेदम मारहाण!

0Shares

TikTok व्हिडिओ तयार करत असताना जोरात हसल्याचा संशय आल्यामुळे चार जणांनी दोनजणांना जबर मारहाण केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. यासंदर्भात ओवेस, कैफ, मोहिश, अशरफ या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी रॉड, बांबू आणि धारदार चॉपरने वार करीत अब्दुल्ला आणि फिर्यादी युसूफ यांना बेदम मारहाण करण्यात आली.

TikTok वरून हाणामारी?

टेम्पोचालक युसूफ अकबर सलकी यांचा भाऊ अब्दुल्ला आणि त्याचे दोन मित्र मुंब्र्याला एका बिल्डिंगखाली उभे होते.

त्याच दरम्यान दुसरीकडे याच बिल्डिंगच्या खाली काही अंतरावर आरोपी ओवेस, कैफ, मोहिश आणि अशरफ हे टिकटॉक व्हिडिओ बनवत होते.

त्यावेळी अब्दुल्ला आणि त्याचे मित्रांनी जोरात हसले.

ते आपल्यालाच हसत असल्याचा समज TikTok करणाऱ्या टोळक्याचा समज झाला.

त्याचाच राग मनात धरून आरोपी ओवेस, कैफ, मोहिश आणि अशरफ यांनी अब्दुल्लाला जवळ बोलावलं.

त्याला हसण्याबद्दल जाब विचारला.

आपण आपसांत हसत होतो, तुमच्यावर आम्ही हसलो नाही असं उत्तर त्यावेळी अब्दुल्लाने दिलं.

मात्र TikTok बनवणारं टोळकं मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतं.

त्यांनी अब्दुल्लाला मारझोड करण्यास सुरुवात केली.

तेव्हा अब्दुल्ला याने युसूफ याला ओरडून आवाज दिल्याने युसूफ हा खाली आला.

त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी ओवेसने मात्र त्याच्या जवळच्या धारदार शस्त्र चॉपरने पोटाच्या बारगड्यावर वार केला.

यात अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला.

त्यासोबतच युसुफही जखमी झाला.

आरोपी ओवेस याने धारदार शस्त्राने तर मोहिशने लोखंडी रॉडने अब्दुलच्या डोक्यात प्रहार केले.

जखमी अवस्थेत अब्दुल्लाला मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले.

अब्दुल्लाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता अब्दुल्ला याला वैद्यकीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या पोटावर झालेल्या गंभीर वारामुळे रुग्णालयात त्याला दाखल करून घेण्यात आलं. त्याला 17 टाके पडले असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी ओवेस, कैफ, मोहिश, अशरफ यांच्याविरोधात जखमी अब्दुल्ला याचा भाऊ युसूफ याने गुन्हा दाखल केला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: