‘नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा’ – चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘मी मोदीला मारूही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वादग्रस्त नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे नान पटोले वादात सापडले असून विरोधक पटोलेंवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी जे नियमात असेल ते करावे मात्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
पटोलेंच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाना पटोले यांचे वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी परिसरात सदनिका आहे. इथे रोजच्या बंदोबस्तापेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात केला असून नागपूर पोलिसांचे कमांडो तैनात करण्यात आले आहे.