Wed. Oct 5th, 2022

नूपुर शर्मावर खटला दाखल करा – असदुद्दीन ओवैसी

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी ऑल इंडिया इमाम काऊन्सिलकडून नुपूरवुकेजीच  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपास प्रकरणी पोलिसांनी मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नूपुर शर्मावर खटला दाखल करण्याची मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

मोहम्मद पैगंबर यांचे अस्तित्व मुसलमानांसाठी सर्वोच्च पवित्र बाब असल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. भाजपच्या नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. मात्र, अद्याप नूपुर विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नूपुर शर्मावर कारवाईला टाळाटाळ का होतेय? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केला आहे. तर, नूपुर शर्माविरोधात खटला दाखल करा, अशी मागणीही ओवैसी यांनी केली आहे. तसेच मुसलमानांसाठी सर्वोच्च पवित्र अस्तित्व असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य  करणाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतात मुसलमानांना प्रतिष्ठा आहे का? असा सवालही खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

मुंब्रा पोलिसांचे नुपूर शर्मा यांना समन्स

दरम्यान, नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोहम्मद पैंगबर यांच्याबबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ऑल इंडिया इमाम काऊन्सिलकडून नूपुरवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याप्रकरणी तपास करण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी नूपुर शर्मा यांना समन्स बजावले आहेत.

राज्यसभा निवडणुकीवर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत अद्याप मविआकडून आमच्याशी संपर्क झाला नसल्याचे नांदेडमध्ये आयोजित सभेत सांगितले. ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी महाविकास आघाडीच्या वतीने कुणी बोलले नाही, तसेच आमच्या आमदारांसोबत कुणी बोलल नाही. महाविकास आघाडीला आमची गरज असल्यास त्यांनी एमआयएमशी संपर्क करावा. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आम्ही दोन दिवसात आमचा निर्णय घेणार असल्याचे अससुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.