अजान सुरू असताना गाणी लावल्यामुळे गुन्हा दाखल

अजान सुरू असताना गाणी लावल्यामुळे रेल्वे पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
रेल्वे पोलिसात उपनिरीक्षक किशोर गडप्पा मलकू नाईक यांनी घराच्या मागे असलेल्या मशिदीच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात गाणे लावले. त्यामुळे रेल्वेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे गुन्हा दाखल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी सायंकाळी राहत्या घराच्या मागे मशिदीच्या दिशेने नमाज पठन करण्याच्या वेळी किशोर गडप्पा मलकू नाईक यांनी मोठ्या आवाजात गाणे लावले. त्यामुळे गाणी लावून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.