Sun. Oct 24th, 2021

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीविरोधात याचिका दाखल

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाकडून भोपाळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांना उमेदवारी दिल्यामुळे मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारी विरोधात याचिका दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका दाखल केली आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

निसार अहमद सय्यद बिलाल यांनी याचिका दाखल केली आहे.

उमेदवारी मिळण्यापूर्वी एनआयए कोर्टाकडून तब्येतच्या कारणामुळे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी जामीन मिळवला होता.

मात्र त्यांना निवणूक लढवण्याची परवानगी मिळू नये अशी मागणी या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा ठाकूर लढणार आहेत.

मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *