इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते शहबाझ शरीफ यांनी इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. ३१ एप्रिल रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पाकिस्तानी संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांनी मांडलेला प्रस्ताव पाकिस्तानी संसदेने दाखल करून घेतला आहे. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत पाकिस्तानी संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांचे शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा आत्मविश्वास इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे.