Mon. Jan 17th, 2022

राजश्री फिल्मचे संस्थापक राजकुमार बडजात्या यांचे निधन

राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले.ते सूरज बडजात्या यांचे वडिल होते.

मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चित्रपट समीक्षक अक्षय राठी यांनी ट्‍विट करून ही माहिती दिली.

आज सकाळी राजकुमार बडजात्या यांचे निधन झाले आहे.राजबाबू अतिशय चांगले निर्माते होते. असे त्यांनी ट्‍विटमध्‍ये म्हटलं आहे.

राजश्री प्रॉडक्शनने देखील त्याच्या अधिकृत वेबसाईटवरून श्रध्दांजली वाहिली आहे.

राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने सुपर-डुपर चित्रपटांची निर्मिती केली.

राजश्री प्रॉडक्शनचे गाजलेले चित्रपट

1972 – पिया का घर

1994 –  हम आपके है कौन

1999 –  हम साथ साथ है

2018 – ‘हम चार’ हा चित्रपट

याशिवाय अनेक दमदार चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिले.त्याच्या निधनानेे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *