तान्हाजी मालुसरेंच्या वंशजाना आर्थिक मदत करा, मनसेची अजय देवगणला विनंती

नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अभिनेता अजय देवगण याला केली आहे.

यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी ट्विट केलं आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर ?

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजय देवगण यांच्या तान्हाजी सिनेमाचं कौतुक केलं.

सन्माननीय अजय देवगण, जय महाराष्ट्र. तान्हाजी सिनेमा फार चांगला होता. मी स्वत: 2 वेळा पाहिला.

तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

तान्हाजी मालुसरे यांचे वंशज कठिण परिस्थितीत जगत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे.

तान्हाजी मालुसरे यांच्या कुटुंबाच्या प्रती तुमंच उत्तरदायित्व बनतं.

माझी आपल्याला विनंती आहे की, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांना 2 कोटी रुपयांची मदत करावी.

असं केल्यास मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुमचा ऋणी राहिल, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान काही आठवड्यांपूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अजय देवगणने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यात हा सिेनेमा करमुक्त करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनीही हा सिनेमा पाहिला होता.

Exit mobile version