Wed. Jun 26th, 2019

शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्या

0Shares
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर सकाळी आलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर 10 वाजताच्या सुमारास सफाई करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला गाडीत संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणाने घटनास्थळी धाव घेतली.

नेमकं प्रकरण काय ?

लोकमान्य टिळक टर्मिनलवर आलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
ही एक्सप्रेस नेहमीपेक्षा सव्वादोन तास उशीरा स्थानकावर दाखल झाली होती.
6 वाजता येणारी शालिमार एक्सप्रेस 8 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनलवर दाखल झाली होती.
10 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी गाडीत साफ सफाई करण्यासाठी गेल्यानंतर कर्मचाऱ्याला संशयस्पद वस्तू सापडली.
या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणाने घटनास्थळी धाव घेतली.
त्यामुळे ही जिलेटीनच्या 5 कांड्या कुठून आल्या याचा शोध सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: