Sat. May 25th, 2019

निवडणुकीचे काम नाकारल्याने शिक्षकांसह 26 जणांवर FIR

43Shares

लोकसभा निवडणुकांमुळे 10 वी आणि 12 वी चे निकाल उशीरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 वी आणि 12 वी चे पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीचे काम लावल्याने निकालांना विलंब होणार असल्याचे सांगण्यात येत होत. यामुळे काही शिक्षकांनी या कामास नकार दिला होता. यामध्ये सोपारा  इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांसह 26 जणांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एका शिक्षकाकडे सुमारे ३०० ते ४०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचे काम असून हे काम काही सुरू होत असताना निवडणूक कामांसाठी हजर होण्याचे आदेश या शिक्षकांना देण्यात आले होते.

‘या’ शिक्षकांवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांची लोकसभा निवडणुकांच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली होती.

निवडणुकीच्या मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी करणे यांसह विविध कामे करण्यासाठी केंद्र स्तरावर निवडणूक आयोगाने कामे दिली होती.

नालासोपारा येथील सोपारा इंग्लिश स्कूलमधील 26 कर्मचार्‍यांनी ही कामे करण्यास नकार दिला.

132 संघांच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी गुलाबचंद भोई यांनी  या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली.

लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान  अरुण पाटील, सुरेश राठोड, राजेंद्र घरत, अमोल रावते, अभिमन्यु पवार, नरेंद्र वाघ, आरुन महाले, किशोर अंगारके, विनायक जोशी, संतोष पाटील, अर्चना शेस, अंकुश वळवी, राजेश लोखंडे, राजेंद्र गोसावी, विल्यम लोपीस, सुनील म्हात्रे, हेमलता साळुंखे, भारती हातोडे, दीपाली पाटील, अरुणा शेवाळे, प्रतिभा सोनावणे, अरुण दिवर, सुनंदा सोनावणे, संध्या पाटील, अनघा कवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *