Fri. Aug 14th, 2020

‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘तो’ सीन वादाच्या भोवऱ्यात, FIR दाखल!

सध्या सर्वत्र ‘सेक्रेड गेम्स 2’ची च चर्चा आहे. हा सिझन रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांच्या तर त्याच्यावर उड्या पडल्या आहेत. मात्र आधीच उत्तान दृश्यं, आर्वाच्य भाषा यांसारख्या अनेक गोष्टींमुळे ‘सेक्रेड गेम्स’ वादग्रस्त ठरलंय. त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे.

‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमधील एका दृश्याने शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली BJPचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी यासंदर्भात अनुराग कश्यप यांच्याविरोधात FIR दाखल केलाय.

या वेबसीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान सरताज सिंग या शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दाखवला आहे.

राजकारण, गुन्हेगारी आणि धर्म यांच्यातील साखळी दाखवणाऱ्या ‘Sacred Games’च्या दुसऱ्या सिझनमधील एका भागात सरताज आपल्या हातातील कडं काढून समुद्रात भिरकावून देतो.

‘कडं’ हे शीख धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. ते गुरूंच्या शिकवणुकीवरून परिधान केलं जातं. कड्याचा आदर राखला जातो, अशी माहिती बग्गा यांनी दिलीय.

त्यामुळे अशा प्रकारचं दृश्य जाणीवपूर्वक दाखवून दिग्दर्शक अनुराग कश्यपने शीख धार्मिक भावना दुखावल्या आहेत,  असा आरोप बग्गा यांनी केलाय.


यापूर्वीही अकाली दल पक्षाचे खासदार मनजीतसिंग सिरसा यांनी ‘सेक्रेड गेम्स’ Netflix वरून काढून टाकावी, अशी मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *