Tue. Jun 15th, 2021

दादरच्या पोलीस वसाहतीत भीषण आग; मुलीचा संशयास्पद मृत्यू

मुंबईतील दादर पोलीस वसाहतीला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. तसेच सिलिंडरच्या स्फोटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेमध्ये 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून श्रावणी चव्हाण असे या मुलीचे नाव आहे. मात्र श्रावणीच्या मृत्यूमुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळाले आहे.

नेमकं काय घडलं ?

दादरच्या पोलीस वसाहतीत दुपारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली.

अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

आग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवला आहे.

ही आगीत एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून आजू-बाजूला असणारे तिन घरांचे नुकसान झाला आहे.

15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागले आहे.

आग लागल्यानंतर घराच्या बाहेरून घराची कडी लागली होती.

तसेच पोलिसांना घटनास्थळी प्लॅस्टिकचा डब्बा सापडला आहे.

या डब्ब्यातून केरोसीनचा वास येत असल्याचे म्हटलं जात आहे.

त्यामुळे ही आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *