Sun. Apr 21st, 2019

पॅरिसमधील ऐतिहासिक चर्चचा मनोरा आगीत भस्मसात

14Shares

पॅरिसमधील आठशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक चर्चमध्ये भीषण आग लागली असून या आगीत त्याचा शिखराचा भाग जळून खाक झाला आहे. जगभरात पर्यटकांचे खास आकर्षण ठरणारे पॅरिसमधील ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’या चर्चला ही आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’प्राचीन वास्तूरचनेचा अद्भुत नमुना

पॅरिसमधील आठशे वर्षांपूर्वीचे ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’या चर्चमध्ये भीषण आग लागली.

फ्रेंच गोथिक कॅथेड्रल अशा प्राचीन वास्तूरचनेमुळे हे पर्यटकांचे खास आकर्षण होते.

1160ते 1260  या कालावधीत हे चर्च बांधण्यात आले होते

 

 

387 पायऱ्या चढल्यानंतर या 69 मीटर उंच असलेल्या या चर्चच्या टोकापर्यंत पोहचता येत होते.

फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्टचा राज्यभिषेक याच चर्चमध्ये करण्यात आला होता.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही असं सांगण्यात आलं आहे.

चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला आहे तर शिखराचा भाग आगीत खाक झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *