Sun. Jun 20th, 2021

अंधेरीत एसआरए इमारतीला आग, 2 जणांचा मृत्यू

अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवरील एका इमारतीला काल म्हणजेच मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या उंच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा हे तिथल्या रहिवाशांना माहिती नव्हतं, असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतल्या उंचच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा याची माहिती रहिवाशांना असणं आवश्यक झालं आहे.

अंधेरी पश्चिमेला वीरा देसाई मार्गावरील कदमनगर चाळ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत एसआरए उभारण्यात आलेल्या इमारतीच्या 10 व्या आणि 11 व्या मजल्यावरील घरामध्ये आग लागली. ट्रान्सकॉन असे या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव आहे. दहाव्या मजल्यावरील 1001 क्रमांकाच्या फ्लॅटला ही आग लागली होती. त्याचबरोबर अकराव्या मजल्यावरील 1101 क्रमांकाच्या फ्लॅटलाही या आगीच्या झळांचा फटका बसला दुर्देवाची गोष्ट म्हणजे जवानांना याच फ्लॅटमध्ये 2 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 2 तासानंतर साडे दहा वाजता अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *