Wed. Jun 23rd, 2021

डोंबिवलीतील केमिकल कंपनीला भीषण आग

मुंबईनजीक असलेल्या डोंबिवलीतील एका केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे.

डोंबिवलीमधील एमआयडीसीतील फेज – २ मधील मेट्रो पॉलिथिन कंपनीला ही आग लागली आहे. या आगीच्या स्फोटामुळे कंपनीच्या आजुबाजूचा परिसर हादरुन निघाला.

यावरुन ही आग किती भंयकर आहे, हे समजू शकते.

आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तसेच आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीची भीषणता लक्षात घेता, जवळील सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कंपन्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात आगीचं सत्र सुरुच आहे. सोमवारी दुपारी माझगावमधील जीएसटी भवनाला आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणावर लाकडी फर्निचरचे नुकसान झाले.

तसेच गेल्या गुरुवारी अंधेरी पूर्वेतील एमआयडीसीत एका आयटी कंपनीला आग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *