अंधेरीतील कामगार रुग्णालयाला भीषण आग

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
रुग्ण, परिचारिका, डॉक्टर, इतर कर्मचारी त्या मजल्यावर अडकले असून सर्व जण खिडकीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहेत. रुग्णालयाला काचा असल्यामुळे सर्व धुर आत पसरल्यामुळे अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत अडकलेल्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. शिडीवरून खाली उतरताना एक महिला खाली कोसळली असून तिला ताबडतोब कुपर रुग्णालयात दाखल केले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.