Breaking News

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला भीषण आग

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
रुग्ण, परिचारिका, डॉक्टर, इतर कर्मचारी त्या मजल्यावर अडकले असून सर्व जण खिडकीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहेत. रुग्णालयाला काचा असल्यामुळे सर्व धुर आत पसरल्यामुळे अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.  रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत अडकलेल्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. शिडीवरून खाली उतरताना एक महिला खाली कोसळली असून तिला ताबडतोब कुपर रुग्णालयात दाखल केले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jai Maharashtra News

Recent Posts

बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा

आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर…

14 hours ago

मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची खाती काढून…

17 hours ago

संजय राऊत यांना ईडीचे बोलावणे

संजय राऊत यांना ईडीने समन्स धाडल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार संजय राऊत यांना मंगळवारी…

18 hours ago

निलंबनाच्या संभाव्य कारवाईला शिंदे गटाकडून आव्हान

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती…

19 hours ago

‘सदस्य वाचवण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय’

Edited by - Rajshree Dahiphale एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे सध्या महाविकास आघाडीवर राजकीय संकट उभे ठाकले…

1 day ago

उदय सामंत शिंदे गटात सामील

शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. उदय सामंत हे रत्नागिरी मतदार संघातून…

2 days ago