Fri. Jun 18th, 2021

video: विशाखापट्टणमध्ये तटरक्षक दलाच्या जहाजाला भीषण आग

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली आहे. हे जहाज तटरक्षक दलाचं असून जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या.

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली आहे. हे जहाज तटरक्षक दलाचं असून जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी 28 जणांना कोस्ट गार्डने वाचविले असून या खलाशांपैकी एक जण बेपत्ता झाला आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

विशाखापट्टणमध्ये जहाजास आग

सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमच्या गस्ती पथकातील जहाज कोस्टल जगुआरला भीषण आग लागली आहे. यामध्ये 29 जण असल्याची माहिती मिळाली आहे. हे जहाज समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरविणारे जहाज असल्याच बोललं जातं आहे.

जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी 28 जणांना कोस्ट गार्डने वाचविले असून यापैकी 1 जण बेपत्ता झाला आहे. जहाजावरील आगीवरही नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण समजलेले नाही. बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.

या जहाजाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जवळचं असणाऱ्या तटरक्षक दलाला बचावकार्याला तेथे पाठवण्यात आले. आणि यामध्ये 28 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. यामध्ये 1 जण बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेणं सुरू आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *