Loksabha Election : बिहार मधील महाराजगंज येथे मतदानावेळी गोळीबार

लोकसभा निवडणुकीच्या सहावा टप्प्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील सहा राज्ये आणि दिल्ली मिळून 59 मतदारसंघात हे मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातील 14 हरयाणातील 10 , बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील8, दिल्लीतील 7 व झारखंडमधील 4 जागांसाठी मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, हर्षवर्धन व मेनका गांधी, अखिलेश यादव,दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे या सर्वांच भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदानावेळी बिहारमधील महाराजगंज येथे गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. आरजेडी विधायक आणि जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये वाद झाला. आणि त्यातूनचं हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मतदानावेळी गोळीबार
लोकसभेच्या 6 व्या टप्प्यासाठी आज 59 मतदारसंघात मतदान होत आहे.
सकाळी 7 वाजल्यापासून या मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे.
बिहार मधील महाराजगंज येथे मतदानापूर्वी गालबोट लागण्यासारखा प्रकार घडला आहे.
आरजेडी विधायक आणि भाजपा सर्मथकामध्ये गोळीबार हा गोळीबार झाला आहे.
आरजेडी विधायक आणि जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये वाद झाला.
आणि त्यातूनचं हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराजगंज येथे झालेल्या या गोळीबारात 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण मतदारसंघात अलर्ट जारी केला आहे.