Jaimaharashtra news

साताऱ्यात टोलनाक्यावर गोळीबार एक जखमी

साताऱ्याच्या टोलनाक्यावर एक खळबजनक प्रकार घडला आहे.साताऱ्याच्या आनेवाडी टोल नाक्यावर टोल न भरण्यावरुन वाद झाला आणि या वादामध्ये गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गोळीबारामध्ये आरोपीने एका पाठोपाठ 7  गोळ्या झाडल्या. यामध्ये एक जण जखमी झाला आहे.दरम्यान गोळीबारानंतर आरोपी फरार आहे. गोळीबार करणाऱ्यांमध्ये कुख्यात गुंडाचा समावेश असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

सातारा महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर मध्यरात्री एक वाजता  स्विफ्ट कार टोल न भरता जात होती.

या प्रकरणी टोलचे पैसे देण्यावरून वाद सुरू झाला.

अचानक कार मधील आरोपीने गोळीबार सुरू केला यामध्ये  एका पाठोपाठ 7  गोळ्या झाडल्या.

अचानक झालेल्या गोळीबारा एक जण जखमी झाला आहे

गोळीबारादरम्यान संबधित कर्मचारी लपले. तर व्यवस्थापकांनी पिस्तूल काढून घेतल्याने वातावरण शांत झाले.

या प्रकरणाची दखल घेवून भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीसांचे एक पथक तयार आले आहे.

दरम्यान या घटनेतील जखमी कर्मचाऱ्यांला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

 

 

Exit mobile version