Tue. Dec 7th, 2021

श्रीनगर गोळीबारात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मिरच्या श्रीनगरमध्ये शुक्रवारी सकाळी दहशतवादी हल्ल्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं आहे. यात एक भारतीय सैनिक जखमी झाला आहे. दहशतवाद्यांकडून AK 47 आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

जम्मू काश्मिर राजमार्गवर श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीची तपासणी सुरू होती.

त्यातील एका ट्रक मध्ये दहशतवादी लपून बसले होते.

सैनिकांनी तपासणी सुरू करताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली.

सुरक्षदलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान 2 दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले.

त्या परिसरात सुरक्षादलाकडून घेराव घालण्यात आला.

हे दहशतवादी एका नव्या दहशतवादी संघटनेचे होते. कठूआ हीरानगरच्या हद्दीतून त्यांनी घुसखोरी केल्याची शंका जम्मू काश्मिरचे महासंचालक जी डी पी दिलबाग सिंग यांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे जम्मू श्रीनगर परिसारातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नगरोटा भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *