Fri. Sep 17th, 2021

अमेरिका – वर्जिनियात अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू

अमेरिका – वर्जिनिया येथे अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार वर्जिनिया येथील एका सरकारी इमातीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.हा गोळीबार एका अज्ञात इसमाने केला आहे असं म्हटलं जात आहे. परंतु गोळीबार का केला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या गोळीबारात 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

नेमकं काय घडलं?

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथे एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात 12 जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत हा गोळीबार झालेला आहे.

या घटनेची माहिती मिळत पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या ठिकाणी पोलीसांनी देखील गोळीबार केला यामध्ये एक पोलीस जखमी झाले आहे.

गोळीबार करणारा वर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे.

परंतु गोळीबार का केला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *