Mon. Jul 22nd, 2019

हॉटेलचा पत्ता न सांगितल्यानमुळे युवकावर गोळीबार

0Shares

हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने युवकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सनी चौधरी असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर तिन जणांनी गोळीबार केला आहे. अहमदनगर येथून पांढऱ्या रंगाच्या गाडीतून येत असताना सनीला या तिघांनी थांबवून प्यासा हॉटेलचा पत्ता विचारला. मात्र पत्ता न सांगितल्यामुळे रागाच्या भरात सनीवर गोळीबार करण्यात आला.

नेमकं काय घडलं ?

सनी चौधरी एका हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडल्यावर रस्त्यावरून जात होता.

यावेळी अहमदनगरच्या दिशेने पांढऱ्या रंगाच्या गाडीतून तिन जण आले.

या तिघांनी सनी चौधरीला प्यासा हॉटेलचा पत्ता विचारला.

मात्र सनीने हॉटेलचा पत्ता माहित नसल्याचे सांगितले.

तिघांनी दमदाटी केल्यामुळे त्याने प्यासा हॉटेलचा पत्ता सांगितला.

आधी पत्ता न सांगितल्यामुळे या तिघांनी मिळून त्याला मारहाण आणि शिवीगाळ केली.

तिघांनी दारू पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडाताना त्याच्यावर गोळीबार केला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

फरासखाना पोलिसांनी तिघांपैकी अंबादास होंडेला अटक केली आहे.

पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: