Wed. Aug 4th, 2021

परिस्थितीशी झगडून कोलाटी समाजातील अमित काळे बनला पहिला जिल्हाधिकारी

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’ या ‘सुपर 30’ सिनेमातील डायलॉगने अनेकांना प्रेरणा दिली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवण्याची अशीच किमया केली आहे पंढरपूरच्या कोलाटी समाजातील अमित काळे या तरुणाने. कोलाटी समाजातील पहिला जिल्हाधिकारी बनून त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलंय.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणापासून दूर असलेल्या कोलाटी समाजातून पहिला जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केलंय. शिक्षण हे कोणत्याही उच्चवर्णियांची मिरासदारी नाही हे अमितने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलंय. याचसाठी आज त्याचा समाजाच्यावतीने मोडलिंब येथे सत्कार करण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा करण्यात आला.

आईने दिलेलं स्वप्न अमितला गप्प बसू देत नव्हतं. त्यामुळे त्याने UPSC परीक्षांचा अभ्यास सुरु केला.

दोन वेळा मुलाखतीमधून बाद व्हायला लागल्यानंतरही अमितने जिद्द सोडली नव्हती.

पुन्हा नव्याने त्याने तयारी सुरु केली आणि देशात 212 व्या नंबराने अमित अखेर IAS परीक्षा उत्तीर्ण झाला.

सध्या त्याचं ट्रेनिंग सुरू आहे.

मात्र दोन दिवसांची सुट्टी घेऊन अमित आपल्या आईसह मोडलिंब येथे सत्कार सोहळ्यासाठी आला.

आपल्या समाजातील मुलं शिक्षणापासून फारच दूर असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे ध्येय आज अमित पुढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *