Whatsapp वर तिहेरी तलाक, मुंब्र्यात #TripleTalaq विरोधात पहिला गुन्हा दाखल!

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी आणलेलं आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं तिहेरी तलाक विधेयकाला अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. राष्ट्रपतींनी तिहेरी तलाक विधेयकावर स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. यानंतर ठाण्याजवळील मुंब्रा येथे तिहेरी तलाकविरोधात पहिला गुन्हा दाखल झालाय.
विवाहितेचा मानसिक छळ करून तिला मारहाण केल्यानंतर काही वेळाने Whatsapp तीनवेळा तलाक म्हटल्याचा प्रकार मुंब्र्यामध्ये घडला आहे.
महिलेचा पती इम्तियाज पटेल तसेच तिची सासू रिहाना आणि नणंद सुलताना यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझा मानसिक आणि शारीरिक छळ चालू होता, मी गरोदर असताना माझ्या नवऱ्याने Whatsapp वरून तीन तलाक दिलाय.
सतत माझ्याकडे पैशाची मागणी केली जात होती, सोन्याचे दागिने मागितले जात होते.
एकदा या बाबत माझ्या वडिलांचे आणि नवऱ्याचे यावरूनच भांडण झालं.
ही घटना 2018 ची आहे.
या बाबत मी तक्रार दिली होती.
जेव्हा आता तीन तलाक कायदा पस झाल्यावर गुन्हा दाखल झाला आहे .
या प्रकरणी पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
अनेक महिला तीन तलाक या बाबत मानसिक त्रास सहन करत आहेत. त्यांनीही पुढे यावं आणि आम्हला विश्वास आहे की सरकारने जो कायदा पास केलाय, त्यामुळे मला न्याय मिळेल असे फिर्यादी महिलेने सांगितले आहे …
केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा संमत केल्यानंतरचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन करत आहे..
नुकताच तिहेरी तलाकविरुद्ध कायदा देशात लागू झाला असला, तरी 19 सप्टेंबर 2019 पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मंगळवारी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक पास झाल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं.