Fri. Jun 21st, 2019

#GlimpsesOfKesari: अक्षयच्या ‘केसरी’ची पहिली झलक पाहिलीत का ?  

84Shares

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा 36 व्या शीख रेजिमेंटचे 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या 21 सैनिकांची अविश्वसनीय अशी शौर्यगाथा केसरीतून मोठ्या पड्यावर पाहायला मिळणार आहे.

अक्षयने या सिनेमाची पहिली झलक आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

सारागढीच्या युद्धातील एक छोटसं दृश्य अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या सिनेमाचा ट्रेलर 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण तत्पुर्वी अक्षयने त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची पहिली झलक दाखवली आहे.

या सिनेमात अक्षय सोबत परीणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.

सारागढीच्या युद्धाविषयी आजवर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख पाहायला मिळतात.

आतापर्यंत लढलेलं हे इतिहासातील सर्वात धाडसी युद्ध होतं अशा शब्दात अक्षयने याचं कौतुक केलं आहे.

येत्या 21 मार्च रोजी केसरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

84Shares

Leave a Reply

%d bloggers like this: