Wed. Jun 29th, 2022

वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे. MIM शी युती न झाल्यामुळे आता वंचितने सर्व जागा लढण्याचं ठरवलंय. प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील 22 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पुढील उमेदवारही लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. VBA ने यादी जाहीर करताना त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आलाय.

VBA च्या उमेदवारांची पहिली यादी

शिराळा  -सुरेश जाधव

करवीर – आनंद गुरव

कोल्हापूर -बबन कवडे

कराड दक्षिण -बाळकृष्ण देसाई

कोरेगाव -बाळासाहेब चव्हाण

कोथरूड -दीपक शमदिरे

शिवाजीनगर -अनिल कुऱ्हाडे

कसबा पेठ -मिलिंद काची

भोसरी -शहनवाज शेख

इस्लामपूर- शकिर तांबोळी

पाथर्डी- किसन चव्हाण

कर्जत जामखेड- अरुण जाधव

औसा -सुधीर पोतदार

बहम्मपुरी -चांद्रलाल मेश्राम

चिमूर -अरविंद साडेकर

राळेगाव  -माधव कोहळे

जळगाव- शफी शेख

अहेरी -लालसू नागोटी

लातूर शहर- मणियार राजासब

मोर्शी -नंदकिशोर कोयटे

वरोरा -आमोद बावणे

कोपरगाव अशोक गायकवाड

 

पुढील यादी 26 सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यापूर्वी काँग्रेसकडे 144 जागांची मागणीही वंचितने केली होती. मात्र काँग्रेसने आम्हाला चर्चेत गुंचवून ठेवलं. अखेर आपलं सँडविच होऊ नये, असा विचार करून आपण सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.