Fri. May 7th, 2021

‘झुंड’चा फर्स्ट लूक, नागराज मंजुळेचं Bollywood पदार्पण

‘फँड्री’, ‘सैराट’सारख्या दमदार सिनेमांतून मराठी सिनेमाचा चेहरामोहरा बदलणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता ‘झुंड’ सिनेमातून ‘बॉलिवूड’मध्ये पदार्पण करत आहेत. नागराज पोपटाराव मंजुळे दिग्दर्शित झुंड (Jhund) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. मंजुळेंच्या पहिल्याच सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘झुंड’चा फस्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे.


नागराज मंजुळे दिग्दर्शीत झुंड हा सिनेमा स्लम सॉकर विजय बारसे यांच्या जिवनावर आधारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. विजय बारसे यांनी ‘स्लम सॉकर’ म्हणजेच झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं होतं.

अमिताभ बच्चन या सिनेमात फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचं शुटिंग नागपूरमध्ये करण्यात आलंय. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय यांमुळे प्रेक्षकांच्या सिनेमाप्रती अपेक्षा वाढल्या आहेत. नागराज मंजुळेचा हा पहिला बॉलिवूड सिनेमाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *