Mon. Aug 15th, 2022

सईच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

सई ताम्हणकरने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. बऱ्याच प्रसिद्ध चित्रपटात सईने भूमिका साकरल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. ती आताच अमेय वाघसोबत “गर्लफ्रेंड” या सिनेमात झळकली होती. आता पुन्हा एकदा ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी “कुलकर्णी चौकातला देशपांडे” हा चित्रपट रिलीज होणार आहे. सईची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटात तिचा असलेला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत आपल्या राजेश श्रृंगारपूरे आणि निखिल रत्नपारखी हे देखील भूमिका साकारत दिसणार आहे.

स्मिता प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे निर्माते विनय गानू हे आहेत.

हा चित्रपट 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.