वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण कुठे दिसेल, जाणून घ्या याबाबत

पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यानंतर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येतो. पण तरीही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं. धार्मिक ग्रंथात ग्रहणसंबंधीत काही गोष्टी आहे. या गोष्टींना लोक आजही मानतात आणि त्या पाळतात. कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचे मानले जाते. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुधवार 26 मे 2021 रोजी लागणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे. शिवाय या दिवशी गौतम बौद्धांचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणतात. ज्योतिषाचार्य महिपालजी प्रधान यांच्या मते, हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात लागेल. चंद्र ग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी प्रारंभ तर संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांना समाप्त होईल. या चंद्रग्रहणाशी विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया…
१ कुठे दिसेल चंद्रग्रहण : भारतात चंद्रग्रहण हे काही विशिष्ट भागात दिसणार आहे. भारताच्या पूर्व भागांत हे चंद्रग्रहण बहुतेक दिसेल. यात बंगाल, पूर्व ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे तर हे ग्रहण भारतात काही मिनिटांसाठी दिसणार आहे. भारतात पूर्व क्षितिजाच्या खाली असल्यानं हे ग्रहण दोन भागात दिसेलं.
२. परदेशात कुठे दिसेल : हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसणार आहे तर हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.
३. सूतक काळ : भारतात हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण म्हणून पाहिलं जाणार यामुळे, चंद्रग्रहण होण्यापूर्वी 9 वाजता लागणारा सूतक काळ हे भारतात मान्य नसेल.
४ वर्ष 2021 मध्ये किती ग्रहण : या वर्षी चार ग्रहण लागणार असून दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. या वर्षातील हे पहिले ग्रहण तर दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी लागेल. 10 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि 4 डिसेंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण लागेल.
५. ग्रहणाविषयी धार्मिक मान्यता काय : धार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करत असतात. जेव्हा ते सूर्य आणि चंद्रावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सूर्य आणि चंद्र कमजोर होतात त्यामुळे ग्रहण लागतं. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या काळात पुजा यज्ञ देखील करतात. भारतात ग्रहण लागणं हे अशुभ मानतात. मात्र खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून बघितल्यास ग्रहण लागणं हे नैसर्गिक आहे.