‘काळ’ ठरणार रशियात झळकणारा पहिला मराठी सिनेमा

मराठी सिनेमाच्या कक्षा विस्तारत आहेत. परदेशातही आता मराठी सिनेमा प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. आगामी ‘काळ’ हा भयपट तर थेट रशियात प्रदर्शित होणार आहे. रशियामध्ये प्रदर्शित होणारा ‘काळ’ हा पहिला वहिला भारतीय मराठी सिनेमा ठरला आहे.

रशियाच्या एकूण 30 शहरांत 100 थिएटर्समध्ये ‘काळ’ सिनेमाचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे.

मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेण्यात ‘काळ’चा मोठा वाटा असणार आहे.

मॉस्कोमध्ये होणाऱ्या चौथ्या ‘बॉलिवूड फिल्म फेस्टिवल’ मध्ये ‘काळ’ सिनेमाला मानाचं स्थान मिळालं आहे.

‘काळ’ सिनेमाच्या प्रिमियरनेच या फेस्टिवलची सुरूवात होणार आहे.

मास्कोच्या ‘कारो 11ऑक्टीबर’ या प्रसिद्ध ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे.


‘काळाचे ग्रहण फार वाईट एकदा लागले की सहजा सहजी सुटत नाही’, अशी टॅगलाइन असलेल्या ‘काळ’चे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झालं.

24 जानेवारीला काळ हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. एका वेगळ्या विषयाची मांडणी चित्रपटात करण्यात आलेली आहे. मराठीत असा भयपट पहिल्यांदाच पहायला मिळणार आहे.

काय आहे सिनेमात?

सिनेमाची कथा ही पॅरानॉर्मल गोष्टींच्या संकल्पनेवर आधारित आहे.

सिने‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’सारख्या गाजलेल्या सिनेमाच्या पठडीतला हा सिनेमा आहे.

ऱशियात अश्या प्रकारचे सिनेमे जास्त प्रमाणात पाहिले जातात.

त्यामुळे काळ सिनेमा रशियात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

“रशियात प्रदर्शित होणारा काळ हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि तो सिनेमा आमचा आहे ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.” असे फेम्स प्रोडक्शनचे निर्माते हेमंत रूपारेल आणि रणजीत ठाकूर यांनी सांगितलं.

तर भारतातही या सिनेमाला मोठं यश मिळेल, असं रशियायाच्या ‘इनसाइड प्रमोशन’ कंपनीचे मुख्य अधिकारी तातीयाना मिश्कीनो यांनी सांगितले.

सिनेमातचे लेखन,दिग्दर्शन डी संदीप यांनी केलं असून फेम्स प्रोडक्शनचे निर्माते हेमंत रूपारेल,रणजीत ठाकूर, नितीन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

सतिश गेजगे, संकेत विश्वासराव,श्रेयस बेहरे, राजकुमार जरांगे,वैभव चव्हाण,गायत्री चिघलीकर ही नवी कलाकार मंडळी सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Exit mobile version