Thu. Mar 21st, 2019

त्या ‘हत्या-आत्महत्या’ प्रकरणाचा उलगडा

21Shares

ठाण्यामध्ये घडलेल्या जोडप्याच्या हत्येचा खुलासा झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, रोजच यावरून होणारी वारंवारची भांडणे, पोलीस ठाणे आणि रोजची कटकट या सर्व गोष्टींना मृतक पतीने कायमची संपवली. पती सुनील सांगळे याने  बुधवारी झालेल्या भांडणावरुन त्याची पत्नी अर्चना हिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला.

केव्हा आणि कशी केली हत्या?
मृतक आरोपी सुनील सांगळे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत होता.

अर्चना IT पार्कमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होती.

दोघांना 3 वर्षांची मुलगी आहे.

अर्चनाच्या चारित्र्यावर सुनीलला संशय होता. त्यावरून दोघात नेहमीच भांडणे होत होती.

बुधवारीही रात्री भांडण झालं आणि सुनीलने अर्चनाचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर त्याने अर्चनाच्या घरी फोन करून “तुमच्या मुलीला देवाघरी पाठवलं” असं सांगितलं.

त्यानंतर त्यानेही गळफास लावून आत्महत्या केली.

3 वर्षांच्या मुलीसमोरच हत्या

सुनील अर्चनाला अनेकदा शिविगाळ आणि मारहाण करायचा.

मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार दाखल केली होती.

बुधवारी दोघांमध्ये झालेल्या कडाक्याची भांडणात मात्र सुनीलने अर्चनाची हत्या केली.

सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे पत्नी अर्चनाची हत्या केल्यानंतर रात्री तीन वर्षाच्या चिमुरडीला घेऊन सुनील हा बाहेर आला.

त्याने मुलीला आईस्क्रीम दिले आणि घरी परतला.

रात्रभर ते दोघे बाप-लेक मृत अर्चनाच्या मृतदेहाजवळ बसले होते.

अजाण चिमुरडी ही आपल्याच आईच्या बाजूला बसली होती.

आरोपीने कशी केली आत्महत्या ?

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सुनीलने मृतक पत्नी अर्चनाच्या कुटुंबियांना फोन केला.

“तुमच्या मुलीला देवाघरी पाठवले” असं सांगून त्याने फोन बंद केला.

दुपारी सुनीलने घराच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरी लावली.

त्याने गळफास लाऊन आत्महत्या केली.

पोलिसांचा तपास 

श्रीनगर पोलिसांना अर्चनाच्या कुटुंबीयांनी संपर्क केला.

पोलीस मोबाईलच्या माध्यमातून शोध घेत घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी दरवाजा ठोठावल्यानंतर त्या चिमुरडीनेच दरवाजा उघडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरवाजा उघडल्यानंतर एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आणि दुसरा अर्चनाचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळला.

सुनीलने केलेल्या फोनमुळे या थरारक हत्या आणि आत्महत्येचा उलगडा गुरुवारी दुपारी झाला.

पोलिसांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात सुनील विरोधात गुन्हा नोंदविला आहे. घाटनास्थळी पोलीस उपयुक्त, सहाय्यक आयुक्त , श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक(गुन्हे) यांनी पाहणी केली.

भिंतीवर लिहिलेली ‘ती’ नावं कुणाची?

आरोपी मृतक सुनील याने घराच्या भिंतीवर खूप काही लिहिलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याची लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याने घराच्या भिंतीवर अनेकांची नावे लिहली आहेत.

यात पत्नीच्या कुटुंबियातील काही लोकांची आणि 9 जणांच्या नावाचा उल्लेख भिंतीवर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान आता श्रीनगर पोलीस भिंतीवर लिहलेल्या नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *