Fri. Jun 21st, 2019

किंग खान घेणार बीग बींचा ‘बदला’

39Shares

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट बीग बींनाच आव्हान दिल्याने सोशल मीडियावर सध्या धूमाकूळ उडाला आहे. “मैं आपसे बदला लेने के लिए आ रहा हूँ…बच्चन साहब,आप तैयार रहिए I”असे ट्विट केले आहे. त्यामुळे Badla Poster मधून शाहरूख  बीग बींचा बदला घेणार आहे. या ट्विटमुळे चाहत्यांचा गोंधळ निर्माण झाला.

शाहरूख याने  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “मैं आपसे बदला लेने के लिए आ रहा हूँ…बच्चन साहब, आप तैयार रहिए I” असे ट्विट केले.

किंग खानच्या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले.

शाहरूखच्या या ट्विटवर बीग बीं यांनी “बदला लेने का टाइम तो निकल गया….. अब तो सब को बदल देने का टाइम है ” असे उत्तर दिले.

बॉलिवूडच्या या दोन सुपरस्टारमध्ये नक्की काय चालू आहे, असा  चाहत्यांमध्ये  प्रश्न निर्माण झाला.

तेव्हाच अमिताभ यांनी आपल्या आगामी बदला चित्रपटाविषयी दोघे बोलत असल्याचे सांगितले.

शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर या एंटरटेन्मेंटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली.

ट्विटरवरील या युद्धामुळे बीग बींनी प्रथमच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं.

या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित होईल.

“बदला”  हा क्राईम थ्रिलर असून सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार आहे.

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील.

39Shares

Leave a Reply

%d bloggers like this: