Mon. Jul 22nd, 2019

रजनीकांतच्या ‘2.0’ सिनेमातील 20 कोटींचं गाणं रिलीज

0Shares

सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रजनीकांत आणि एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या सिनेमातील एकमेव गाणे आहे. चित्रपटाच्या तामिळ आणि तेलगु व्हर्जनचे लिरिक्स/ऑडिओ व्हर्जनमध्ये हे गाणे आधीच रिलीज झाले होते. आता या गाण्याचे हिंदी व्हर्जन रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खास रोबोटिक्स डान्स पाहायला मिळतोय.

अरमान मलिक व शषा तिरूपतीने गायलेल्या या गाण्याबद्दलची आणखी एक खास बाब म्हणजे, हे एक गाणे बनवण्यासाठी 20 कोटी रूपये खर्च करण्यात आले. म्हणजे, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वात महागडे गाणे आहे. ‘2.0’चे हे गाणे रिलीज झाल्याबरोबरच या गाण्याला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

अवघ्या काही तासातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत लाखो चाहत्यांनी हे गाणे पाहिले आहे. यावरुनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची असलेली उत्सुकता लक्षात येते. या सिनेमात अक्षय कुमार आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार क्रोमॅन बनला आहे तर रजनीकांत डबलरोलमध्ये दिसणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: