Fri. Jan 28th, 2022

‘आधी युती मग गद्दारीने मुख्यमंत्रीपद मिळवलं’; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

  निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर बरसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता त्यांचेच कौतुक करत आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आधी युती केली आणि मग मात्र गद्दारीने मुख्यमंत्रीपद मिळवले, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पवारांवरही टीकेची झोड सोडली आहे.

  केंद्रीय मंत्री नारायण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा लाचार नेता मी पाहिलेला नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाबाहेर काढले. मात्र तरीही सत्तेसाठी शरद पवार त्यांच्याकडे गेले. नशीब महाभारतात पवार नव्हते. अन्यथा त्यांनी तिथेही फोडाफोडी केली असती. क्षमता नसतानाही पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आता ते पवारांचे गोडवे गात आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

  दादरा-नगर हवेली अपक्ष उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या आहेत. त्यावेळी भाजप उमेदवार पराभूत झाल्यामुळे शिवसेनेने जल्लोष साजरा केला. मात्र कलाबेन डेलकर हे अपक्ष असून त्यांची निशाणी फलंदाजी होती. धनुष्यबाण नाही. त्यामुळे यात शिवसेनेने जल्लोष करण्यासारखे काही नाही. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची शिवसेनेची सवय आहे. दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा शाखाप्रमुखसुद्धा नाही. असा टोला नारायण राणेंनी राज्य सरकारवर लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *