Mon. Aug 8th, 2022

‘आधी अटक आणि मग आरोप होतात’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. तसे केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप कशाप्रकारे गैरवापर वापर करते यावरही त्यांनी भाष्य केलं. सामनातील उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला त्यात त्यांनी अनेक मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. देशात आज अनेक प्रश्न आहेत. महागाई वाढत आहे, बेरोजगारांची संख्या वाढतेय. या महत्त्वाच्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही, थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय का? या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल काही वेळा न्यायालयानेही आपली मते नोंदवली आहेत. अलीकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांचे मंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होण्याची शक्यता आहे. आधी अटक, मग आरोप ठरवतील आणि कालांतराने त्यातनं ते सुटतात. तोपर्यंत तुम्ही त्यांचे आयुष्य बरबाद केलेलं असतं. मात्र कुणाचे आयुष्य बरबाद करून कोणाला सुख लाभत असेल असे मला वाटत नाही. अशी लोकं कधी सुखात राहू शकतील आणि शकतात यावर माझा विश्वास नाहीय. त्याच्यामुळे ठीक आहे, लोकशाही आहे.

सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, ‘सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.’ देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.